शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर घोटाळ्याचे ‘समाजकल्याण’ कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:01 IST

दत्ता पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : अनुदानावर ट्रॅक्टर देतो, असे सांगून एका ट्रस्टने तासगाव तालुक्यातील शेतकºयांची लाखो रुपयांची फसवणूक केली. त्यासाठी शेतकºयांना समाजकल्याण विभागाकडून हे ट्रॅक्टर मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यासाठी समाजकल्याण विभागा शी संबंधित, बचत गटातील महिलांचा वापर करण्यात आला. त्यामुळे ट्रॅक्टर अनुदान घोटाळ्याशी समाजकल्याण विभागाचे कनेक्शन असल्याची ...

दत्ता पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : अनुदानावर ट्रॅक्टर देतो, असे सांगून एका ट्रस्टने तासगाव तालुक्यातील शेतकºयांची लाखो रुपयांची फसवणूक केली. त्यासाठी शेतकºयांना समाजकल्याण विभागाकडून हे ट्रॅक्टर मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यासाठी समाजकल्याण विभागाशी संबंधित, बचत गटातील महिलांचा वापर करण्यात आला. त्यामुळे ट्रॅक्टर अनुदान घोटाळ्याशी समाजकल्याण विभागाचे कनेक्शन असल्याची चर्चा होत आहे, तर पैसे परत मिळण्याच्या आशेवर असणाºया शेतकºयांच्या फसवणुकीला जबाबदार कोण? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अशी त्रिस्तरीय यंत्रणा कार्यरत आहे. बहुतांश योजना या ठिकाणाहून आणि काही योजना थेट राज्य शासनाच्या विभागाकडून वर्षानुवर्षे राबवल्या जात आहेत. या योजनांचा प्रचार आणि प्रसार वेळोवेळी शासकीय यंत्रणेकडून, लोकप्रतिनिधींकडून केला जातो. शेतकºयांसाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावरून, तसेच राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून काही योजना राबविल्या जातात. मागासवर्गीय शेतकºयांसाठी या विभागाबरोबरच समाजकल्याण विभागाकडूनही विशेष योजना राबविल्या जातात. काही योजना थेट व्यक्तिगत लाभार्थ्यांसाठी, काही बचत गटांसाठी, तर काही योजना सामूहिक शेतीसाठी आहेत. याव्यतिरिक्त अन्य कोणतीच योजना शासनाकडून राबवली जात नाही.अलीकडेच शासनाकडून प्रशासकीय पातळीवर होणाºया गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी अशा योजनांचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बॅँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.ही वस्तुस्थिती असतानाही तालुक्यातील शेतकºयांची अनुदानाच्या आमिषाने फसवणूक झाली. या फसवणुकीकडे लोकप्रतिनिधींनी सोयीस्कर दुर्लक्ष केले. किंबहुना फसवणूक झालेल्या शेतकºयांपैकी बहुतांश शेतकºयांनी पंचायत समिती सदस्यांवर विश्वास ठेवूनच पैसे देऊ केले होते. पंचायत समिती सदस्यांनाच शासकीय योजना कोठे आणि कशा पध्दतीने राबवल्या जातात, याची माहिती नसल्याचेही यानिमित्ताने चव्हाट्यावर आले. लोकांचे प्रतिनिधीत्व करताना, कोणती योजना कोठून राबवली जाते, याची माहिती नसल्यामुळे हे सदस्य कोठेही अस्तित्वात नसलेल्या अनुदानाच्या योजनेला बळी पडले. किंंबहुना हे सदस्य गळाला लागल्यामुळेच गंडा घालणाºया ट्रस्टचे काम सोपे झाल्याचे निष्पन्न झाले.दुसरीकडे ज्या ट्रस्टने ट्रॅक्टर अनुदानाची योजना राबवली, त्यांनी समाजकल्याण विभागाचा संदर्भ दिल्याचे शेतकरी सांगत आहेत. समाजकल्याण विभागाकडून मागासवर्गीय बचत गटांसाठी दहा टक्के रक्कम भरुन लहान ट्रॅक्टर खरेदीसाठी ९० टक्के अनुदान देण्यात येते. हे ट्रॅक्टर मिळवून देण्यासाठी समाजकल्याण विभागाशी संबंधित बचत गटातील महिलांना हाताशी धरुन कारनामे करण्यात आले आहेत. यापूर्वीही समाजकल्याण विभागाचे टॅÑक्टर एकाकडून घेऊन दुसºयाला देण्याचे उद्योग झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे ट्रॅक्टर अनुदानाच्या घोटाळ्याचे कनेक्शन समाजकल्याण विभागाशी असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे या घोटाळ्याची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे.गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ?लाखो रुपयांची फसवणूक झालेली असताना, संबंधित शेतकºयांकडून अद्यापही पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. काही शेतकºयांना ट्रस्ट आणि मध्यस्थांनी दिलेले धनादेश वठलेले नाहीत. इतके असूनही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचे चित्र आहे. पंचायत समिती सदस्यांच्या पुढाकारानेच ही रक्कम पुढे देण्यात आली आहे. गुन्हा दाखल केल्यास नाव चव्हाट्यावर येईल, या भीतीनेच सदस्यांकडूनच रक्कम परत देण्याची हमी घेऊन गुन्हा दाखल करण्यापासून थांबविण्यात येत असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती